19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ६३ हजार मुले ॲनिमियाग्रस्त

राज्यात ६३ हजार मुले ॲनिमियाग्रस्त

मुंबई : अ‍ॅनिमिया (पंडुरोग किंवा रक्तक्षय) म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होणे. यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. शरीरातील इतर सर्व पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि पर्यायाने अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. जागृत पालक, सुदृढ मुले मोहिमेअंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑगस्टपर्यंत ६३ हजार बालके ॲनिमियाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मुलांची तपासणी करण्यात आली आहे.

ॲनिमियामध्ये रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी होते. पर्यायाने अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलांची बौध्दिक क्षमता व शारिरीक विकास कमी होतो. बऱ्याचशा अ‍ॅनिमियाचा सकस आहाराशी संबंध असतो. गरीब घरांमधील मुले या आजाराने ग्रस्त असतील, तर हे समाजण्यासारखे आहे. जवळपास ५० टक्के मध्यम किंवा उच्च-मध्यम उत्पन्न वर्गातील मुलेही अ‍ॅनिमियाने ग्रस्त असतात ही गंभीर नोंद घेण्याची बाब आहे. किशोरवयीन मुलांत १२-१४ वयात विकास-चढ येतो. तेंव्हा लोहाची मात्रा रक्तात भरपूर असणे गरजेचे आहे. मुलींना मासिक पाळीतून होणाऱ्या रक्तस्रावामुळे अ‍ॅनिमिया टाळायला दर महिन्याला लोहाची आणि हिमोग्लोबिनची योग्य भरपाई व्हावयास हवी.

बहुतांश वेळा अ‍ॅनिमिया आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे होतो. काही विशिष्ट जीवनसत्त्वाची कमतरता (बी १२ जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड) अतिरक्तस्राव, लहान मुलांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव, लाल पेशींचे जास्त प्रमाणात सतत विघटन करणारे काही आनुवंशिक आजार (सिकलसेल अ‍ॅनिमिया, थॅलेसेमिया) तसेच काही दीर्घकालीन आजार याशिवाय इतर कारणेही अ‍ॅनिमियाला कारणीभूत ठरतात.

२ कोटीहून अधिक मुलांची तपासणी
फेब्रुवारीपासून जागृत पालक आणि सुदृढ बालके अभियानांतर्गत २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल १ कोटी, ७६ हजार ४८८ मुलांमध्ये विविध कमतरता जाणवल्या. यामध्ये मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा अशक्तपणा असलेली ६३ हजार २४७ मुले आढळून आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR