22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र७ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

७ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज राज्यातील ७ आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची यांची बदली झाली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून सौरभ राव हे आता सहकार आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर यांना सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांचीदेखील बदली करण्यात आली. सौरभ राव यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुण्याचे नवीन विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मूळचे नांदेडचे असलेले डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे २००८ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी साखर आयुक्त, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक संचालक म्हणून काम केले आहे. २००८ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले. यांच्यासह गोंदियाचे सीईओ अनिल पाटील, साता-याचे सीईओ डी. के. खिल्लारी आदींचा समावेश आहे. आयटीडीपी चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी मुरुगनंथम, आयटीडीपी पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी यशनी नागराजन यांचीही बदली झाली.

धाराशिवचे जि. प. सीईओ गुप्तांची बदली
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची सहव्यवस्थापकीय संचालक महाडिस्कोम, छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR