28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमिझोरममधील ७७ टक्के लोकांनी बजावला मतदानाचा हक्क

मिझोरममधील ७७ टक्के लोकांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली : मिझोराममध्ये मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सर्व ४० जागांसाठी १७४ उमेदवार रिंगणात होते, त्यात १६ महिलांचा समावेश आहे. राज्यात मतदान पूर्ण झाले असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७७.०४ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मिझोराममध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ६९.८७ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. मिझोरममध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ५२.७३ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ८ लाख ५१ हजार ८९५ मतदार आहेत. त्याच वेळी, एकूण मतदान केंद्रांची संख्या १,२७६ होती. मिझोरामच्या ११ जिल्ह्यांमधून लोंगतलाई येथे सर्वाधिक मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिझोरामचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एच. लियानजेला म्हणाले की, मतदान शांततेने संपन्न झाले आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही समस्या उद्भवली नाही. दुसर्‍या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयझॉलमधील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तिथे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी मतदान केले. मुख्यमंत्री सकाळी रामलून वेंगलाई प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गेले पण त्यावेळी ईव्हीएम काम करत नव्हते. त्यामुळे ते घरी परतले आणि पुन्हा सकाळी ९.४० वाजता मतदान करण्यासाठी आले. तसेच मिझोरम विधानसभेसाठी मतदानापूर्वी म्यानमारसह ५१० किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि बांगलादेशशी ३१८ किमी लांबीची सीमा सील करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR