30.9 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeमहाराष्ट्रउसाच्या गाळप हंगामात ८.५८ टक्के साखर उतारा

उसाच्या गाळप हंगामात ८.५८ टक्के साखर उतारा

पुणे : प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या उसाच्या गाळप हंगामात आजवर २७७.५५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून ८.५८ टक्के साखर उतारा मिळाला आहे अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे. राज्यात एकूण १९२ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला असून त्यात ९४ सहकारी आणि ९८ खासगी कारखाने आहेत.

सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाला ९.७६ टक्के तर सर्वांत कमी साखर उतारा नागपूर विभागाचा २.७३ टक्के मिळाला आहे. उपलब्ध माहितीनुसार आजवर ३२४.७९ लाख मे टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यंदा हंगामात उसाचे त्याचबरोबर साखरेच्या उत्पादनात तूट येणे शक्य आहे.अंदाजानुसार साखर उत्पादनात २० टक्के घट अपेक्षित धरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR