14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeराष्ट्रीयनक्षली हल्ल्यात ९ जवान शहीद

नक्षली हल्ल्यात ९ जवान शहीद

लष्कराच्या वाहनावर हल्ला करून घडविला स्फोट

रायपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. जवानांना घेऊन जाणा-या एका वाहनावर नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात ९ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी कुटरू भागात ही घटना घडली.

नक्षल ऑपरेशन विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता हा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी ज्या सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला, त्या वाहनात ९ पेक्षा अधिक जवान होते. सुरक्षा दलानीही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. बस्तरच्या महानिरीक्षकांनी जवानांचे वाहन उडविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात ९ जवान शहीद झाले आहेत.

या हल्ल्यात जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. हे सर्व जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूरमध्ये संयुक्त कारवाई करून परतत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. अलीकडच्या काळात आपल्या जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर इतर ठिकाणांहून जवानांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.

चिलखती वाहनाला लक्ष्य
कुटरू भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या चिलखती वाहनाला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी वाहनावर
आयईडी ब्लास्ट करत स्फोट घडवून आणला. या स्फोटात ९ जवान शहीद झाले तर इतर अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR