लातूर : प्रतिनिधी
विजेसारख्या सेवा क्षेत्राात आपण कार्यरत असून, वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा देणे ही आपली महत्वपुर्ण जबाबदारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करुन संपूर्ण कार्यक्षमतेने अखंडीत वीजसेवेसाठी प्रयत्नरत रहावे, असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) धनंजय औंढेकर यांनी दिले.
येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमूख सभागृहात दि. २ मे रोजी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, अनिल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सुसंवाद मेळाव्यात लातूर मंडळातील हजारो जनमित्र, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना औंढेकर म्हणाले की, वीजग्राहकांना अखंडीत वीजसेवा दिली तर वीजग्राहक आपल्यापासून दुर जात नाही परिणामी आपण विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनीटची वसुली करणे सोपे जाते. सेवेप्रति निष्ठावान असलेल्या काही लाईनमनची उदाहरणे देत लाईनमन कसा असावा व कसा असू नये याविषयी मार्गदर्शन केले.
मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतूक करत, केवळ एका महिण्याच्या कामगिरीवर समाधान मानून चालणार नाही, प्रत्यक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे अशाही सुचना केल्या. त्याचबरोबर १५ मे पर्यंत ३३ केव्ही ११ केव्ही वीजवाहिनीला अडथळा ठरणा-या झाडांच्या फांदयांची रितसर परवानगी घेवून छाटनी करून घ्यावी. आपली वीजवाहिनी ट्रीप होते की नाही याची संबधीतांनी काळजी घ्यायला हवी. ट्रीपींग न झाल्यास वीजतारा तुटन्यांचे प्रकार घडतात, प्रसंगी दुर्घटनाही घडू शकते. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या वीजतारेला लागुन वीजपुरवठा खंडीत तर होतोच सोबतच तब्बल ३० ते ४० हजार युनीटचे नुकसान होते. तसेच ३३/११ केव्ही उपकेद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन दिल्याची खात्री करावी असेही निर्देश दिले.
याप्रसंगी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनीही उपस्थितांना पंचसुत्रीचा अवलंब करत काम करण्याचे निर्देश दिले. सुसंवाद मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रशांत जानराव यांनी केले तर प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी केले. सदरील सुसंवाद मेळाव्यास लातूर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.