27.8 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeराष्ट्रीयकाँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी मी घेतोय

काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी मी घेतोय

राहुल गांधी यांचे वक्तव्य १९८४ च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे विधान

नवी दिल्ली : मी नव्हतो, त्यावेळी पक्षाच्या अनेक चुका झाल्या. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेण्यास मी आहे. मी जाहीरपणे म्हटले आहे की, ८० च्या दशकात जे घडले, ते चुकीचे होते. मी अनेकवेळा सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध असल्याचे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. या कार्यक्रमादरम्यान एका शीख विद्यार्थ्याने राहुल गांधींना १९८४ च्या दंगली आणि शीख मुद्यांवर काही प्रश्न विचारले.

त्या विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारले की तुम्ही म्हणालात की, राजकारण निर्भय असले पाहिजे, घाबरण्यासारखे काहीही नसावे. पण, आम्हाला फक्त कढा घालायचा नाही, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेस पक्षाच्या राजवटीत नव्हते. त्या दंगलीतील आरोपी सज्जन कुमार सारख्या लोकांना संरक्षण देत असलेल्या शीख आवाजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्याने काँग्रेसवर केला.

अमित मालवीय यांची टीका
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हीडीओ शेअर करून राहुल गांधींवर टीका केली आहे. वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, एका तरुण विद्यार्थ्याने राहुल गांधींना म्हटले की, तुम्ही शिखांशी चांगले वागला नाही. आता राहुल गांधी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही टीकेला सामोरे जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR