24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्या‘चॅट-जीपीटी’ बनला वकिल, मिळवून दिला २ लाखांचा रिफंड!

‘चॅट-जीपीटी’ बनला वकिल, मिळवून दिला २ लाखांचा रिफंड!

लुबाडणुकीला चाप । सडेतोड तर्कसंगत मुद्दे मांडले; युक्तीवाद विमान आणि हॉटेल कंपनीला मान्य करावा लागला

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अवाजवी बिल आकारणे, विनाकारण जादा शुल्क वसूल करणे अशा प्रकारच्या कृत्याला सामान्य नागरिकांना अनेकदा सामोरे जावे लागत असते. हे पैसे वसूल करताना खासगी एजन्सी अजिबात दयामाया दाखवत नाहीत. अशा प्रकारात तक्रारीनंतर पाठपुरावा करूनही यश मिळत नाही. परंतु चॅटजीपीटीने केलेल्या मदतीमुळे अमेरिकेतील कॉलिंगहॅम येथील एका रुग्णाची लुबाडणूक टळली आहे.

चॅट-जीपीटीने सडेतोड युक्तिवाद करीत रुग्णाला दंडापोटी देय असलेली मोठी रक्कम मिळाली आहे. युक्तिवादामुळे रद्द झालेल्या बुकिंगसाठी २,५०० डॉलर (सुमारे २ लाख रुपये) परत मिळाले. मेडेलिन यांनी मेडिकल इंजिनीअर असलेल्या मित्राच्या मदतीने चॅट-जीपीटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्या मित्राने एक प्रोग्राम डिझाइन केला आहे, जो चॅट-जीपीटीच्या आधारे काम करतो. चॅट-जीपीटीने एअरलाइनच्या नियम व अटींचा सखोल अभ्यास करून त्याविरोधात काही तर्कसंगत मुद्दे मांडले. चॅट-जीपीटीने मेडेलिन यांच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थितीवर आधारित कायदेशीर मुद्दे सादर करीत या व्यक्तीला प्रवास करणे अशक्य असल्याचे सांगितले. हा युक्तिवाद हॉटेल तसेच विमान कंपनीला मान्य करावा लागला.

एअरलाइन कंपनीने मृत्यू, अपघात किंवा मानसिक आरोग्याची सबळ कारणे असतील तरच परतावा देण्याचे धोरण असल्याचे सांगितले. त्यावर चॅट-जीपीटीने मेडेलिन यांची आरोग्य स्थिती गंभीर असल्याचे पटवून दिले.

कशी झाली फसवणूक?
मेडेलिन नामक व्यक्तीला जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर (जीएडी) आजार होता. याचा त्रास अचानक उफाळून आल्याने मेडेलिन यांना आपले हॉटेल आणि विमान प्रवासाचे बुकिंग रद्द करावा लागले. मेडेलिन यांनी बुकिंग वेळी करताना आजाराची माहिती देणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्रही सोबत जोडले होते; परंतु मेडेलिन यांनी योग्य विमा न घेता तिकीट रद्द केल्याचे कारण पुढे करीत संबंधित हॉटेल आणि विमान कंपनीने तिकिटाचे पैसे परत करण्यास नकार दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR