मुंबई : प्रतिनिधी
‘सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण?’ असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाजमाध्यमावर एक कविता शेअर करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर चित्रा वाघ यांच्या याच कवितेला शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
रोहिणी खडसे यांनी कवितेतून, ‘कशासाठी आमदार व्हायचं असतं काय करू लागली.. जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली.. ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली.. इतका भंपकपणा बरा नव्हे! बस कर पगली’ असे म्हणत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
तर चित्रा वाघ यांनी कवितेच्या माध्यमातून,
विरोधाला विरोध म्हणजेच उबाठा अर्थशून्य. बडबड अन् नुसताच बोभाटा. ‘सामना’त छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम . विसरून जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या .. कधी काढले फोटो अन् कुठे केल्या सह्या. कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग .. अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेचं सोंग .. असतो असा अविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची ‘मी’. भाषेत मात्र टाळ्या घेतात. ‘म्हणून कम अॉन किल मी’..असे भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.