24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयनीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक

नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक

ईडी, सीबीआयची मोठी कारवाई
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली. अमेरिकेच्या अधिका-यांनी ही माहिती भारत सरकारला दिली. नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला ४ जुलै रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई भारतातील दोन मोठ्या यंत्रणा ईडी आणि सीबीआयने केलेल्या एक्स्ट्राडिशन रिक्वेस्टच्या आधारावर करण्यात आली.

भारतातील सर्वांत मोठ्या बँकिंग घोटाळ््यात पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ््याचा समावेश होतो. या घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून नेहाल मोदीचा शोध घेतला जात होता. नेहाल मोदीने त्याचा उद्योगपती भाऊ नीरव मोदीसाठी काळा पैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले होते. ईडी आणि सीबीआय चौकशीत त्याने काही बेनामी कंपन्यांच्या मार्फत मोठी रक्कम विदेशात पाठवली होती. फसवणूक करुन कमावलेल्या पैशांना ट्रॅकबाहेर ठेवण्यामध्ये नेहाल मोदी सहभागी होता.

अमेरिकन प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार प्रत्यार्पणाची कारवाई दोन आरोपांच्या आधारावर केली जात आहे. पहिला आरोप मनी लाँड्रिंगचा आहे. जो मनी लाँड्रिंग कायदा २००२ च्या कलम ३ नुसार दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोप हा भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब आणि २०१ नुसार करण्यात आला आहे.

१७ जुलैला होणार
प्रत्यार्पणावर सुनावणी
नेहाल मोदीच्या प्रत्यार्पणावर आता पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. त्या दिवशी अमेरिकेच्या कोर्टात स्टेटस कॉन्फरन्स होणार आहे. नेहाल मोदी जामीन अर्जदेखील देण्याची शक्यता आहे. त्याला अमेरिकेच्या सरकारचे वकील विरोध करतील. भारत सरकारकडून त्याला तातडीने भारतात आणण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR