23 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeलातूरनंदनवन लॉजमध्ये बालविकास अधिका-याची आत्महत्या

नंदनवन लॉजमध्ये बालविकास अधिका-याची आत्महत्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या नंदनवन लॉजमध्ये प्रवाशी म्हणून आलेल्या बालविकास अधिका-याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. नुकत्याच मोठ्या पदावर रूजू झालेल्या अधिका-याने लातुरात येऊन आत्महत्या का केली याबाबत वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत.
लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर नंदनवन लॉज आहे. या लॉजवर प्रवाशी म्हणून अमरावती येथे कार्यरत असलेले रामदास मोहनराव श्रीरामे हे अधिकारी आले. तेंव्हा काल सकाळी या अधिका-याने या लॉजमध्ये थांबलेल्या रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर काल मंगळवार रोजी त्यांचे मुळ गाव कमळेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामदास श्रीरामे हे एक अत्यंत हुशार असे तरूण होते. त्यांनी स्पर्धा परीक्षा देत असताना त्यांची उच्चपदावर निवड होईल अशी अपेक्षा होती, पण बालविकास अधिकारी म्हणून निवड झाल्याने ते नाराज होते असे चर्चिले जात आहे. गळफास घेण्याअगोदर रामदास श्रीरामे यांनी सुसासाई नोट लिहली असल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सायंकाळी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR