नागपूर : प्रतिनिधी
महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूरची जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
या जागतिक पुरस्काराबद्दल मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या अधिका-यांना शुभेच्छा दिल्या. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्निल डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
कामठी मार्गावरील डबल डेकर हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे अद्भूत उदाहरण आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला. यापूर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती, हे विशेष.
















