डोंग्रज ग्रामपंचायतच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करा

चाकुर : प्रतिनिधी
चाकुर तालुक्यातील मौ. डोंग्रज येथील ग्रामपंचायतने कामामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी चाकुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मौ. डोंग्रज गावाला मिळणा-या विविध शासकीय योजनांचा उपयोग गाव विकासासाठी न करता त्या निधीची कामे न करताच सदरचा निधी हडप केलेला आहे. तसेच जी काही कामे थातूर-मातून केली आहेत. त्याचा उपयोग गाव विकासासाठी झाल्याचे दिसून येत नाही. वित्त आयोगाचा जवळपास ५० टक्के निधी ग्रामपंचायतीने जाणुन बुजून हडप केला आहे. गावातील विकास कामे न करताच शासनाचा निधी हडप केला आहे. दि. ४ जुन २०२६ रोजी ४,१९००० रुपये निधी उचलेला आहे. माहिती अधिकार देताच दि. १५ ऑगस्ट रोजी कामे सुरु केली आहेत. घाई गडबडीत युद्धपातळीवर कामे संपवली जात आहेत. त्यामुळे सदरील कामांची गुणवत्ता शुन्य आहे.
डोंग्रज ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी माधव केरबा सूर्यवंशी हे डोंग्रज ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत आहेत. सदरील कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायतला मिळणा-या विविध प्रकारच्या निधीचा अपव्यय संगनमताने  केला आहे. खोट्या ग्रामसभा व खोट्या कामांचे फोटो सराकरी यंत्रणेला दाखल केलेले आहेत. एकही फोटो जी.पी.एस. कॅमे-यातून घेतलेला नाही. खोटे रेकॉर्ड तयार करण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही. तेव्हा गटविकास अधिकारी यांनी डोंग्रज ग्रामपंचायतीने आजतागायत केलेल्या विविध कामांचा उद्देश सफल झाला का?, याचे मुल्यमापन करावे, शासकीय निधीच्या खर्चाची चौकशी करुन संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, बळीराम कांबळे, प्रमोद देवणे, प्रमोद कासार, बाजाजी जाधव, वसंत नागपूरे, वृषभ जाधव, योगेश नागपूरे, कोंडीबा कुंभारे, लक्ष्मण देवणे, शिवाजी नरवाडे, सीताराम मुंडे, उत्तम व्यंकट, बळीराम खपरले, शंकर कांबळे, अमोल जाधव, गजानन नरवाडे, पांडूरंग नरवाडे, व्ही. एम. निलमवाड, महेश मुंडे, पिराजी टिकलवाड, मारोजी पंदीलवाड, माधव आवळे, बाजाजी उडतेवार, कृष्णा चाकुरे, शिवाजी उडतेवार, बळीराम पंदीलवाड,
प्रणव कुंभारे, हाणमंत कोईलवाड, आकाश जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news