19 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeसोलापूरवाढत्या अस्वच्छतेमुळे करमाळ्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाढत्या अस्वच्छतेमुळे करमाळ्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

करमाळा : प्रतिनिधी
करमाळ्यातील स्वच्छता करण्यासाठी करमाळा नगरपालिका दर महिन्याला 13 लाख रुपये खर्च करते शिवाय नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे काम केले जाते. सुद्धा करमाळा शहर अस्वच्छतेचे माहेरघर झाले असून तुंबलेल्या गटारी रस्त्यांनी पडलेले कचऱ्याचे मोठे मोठे ढीग त्यात फिरणारी मोकाट जनावरे डुकरे मोकाट गुरे मोकाट कुत्रे यामुळे करमाळ्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिका प्रशासन मृत अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे करमाळा नगरपालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून जनतेला उडवडीची उत्तरे दिली जातात.

नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे जनतेला प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता कामगार कागदावर किती व प्रत्यक्षात कामाला किती हा मोठा प्रश्न आहे. या स्वच्छतेच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार सध्या करमाळा चर्चेचा विषय आहे. अधिकारी बालाजी लोंढे कधीही शहरात फिरून स्वच्छतेचे पाहणी करताना दिसून येत नाहीत. करमाळा नगरपालिका म्हणजे आंधळं दळतं कुत्र पीठ खाते असा प्रकार झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR