वैष्णव यांच्याकडून स्वदेशी अ‍ॅपचा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला नवे बळ मिळाले. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या कामकाजासाठी झोहो या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचे अ‍ॅप वापरण्याचा निर्णय घेतला. याआधी अनेक मंत्री आणि सरकारी विभाग परकीय प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून होते. झोहोचा स्वीकार करताना वैष्णव यांनी नागरिकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, स्थानिक तंत्रज्ञान वापरा, असे आवाहन केले. झोहो ही चेन्नईस्थित कंपनी असून दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ई-मेल यांसारख्या सेवा पुरवते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ते आता दस्तऐवज, स्प्रेडशीट्स आणि सादरीकरणांसाठी झोहोचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणार असून, हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी स्वीकारण्याच्या आवाहनाच्या दृष्टीने एक ठोस पाऊल आहे.
अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना उत्सवी काळात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते.

त्याचबरोबर कर प्रणालीतील सुधारणा, जीएसटी दरकपात आणि जीएसटी बचत महोत्सव यांसारख्या उपक्रमांद्वारे लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पार्श्वभूमीवर आयटी मंत्र्यांचा हा निर्णय धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. यामुळे परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होईल, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा सुधारेल.

मोदींचा स्वदेशी मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांपासून वारंवार स्वदेशी उत्पादन आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा मंत्र दिला. याचा उद्देश विदेशी अवलंबित्व कमी करणे, स्थानिक उद्योग, सॉफ्टवेअर कंपन्या, छोटे व मध्यम उद्योग यांना बळ मिळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news