21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र  छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी गेलेल्या फडणवीसांवर काँग्रेसची टीका

  छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी गेलेल्या फडणवीसांवर काँग्रेसची टीका

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. राज्यातील मराठा समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली असून काल (सोमवार) बीड जिल्ह्यात हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. ‘आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में’ अशी आक्रमक टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली आहे.

दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यावरून विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या राज्याच्या गृहमंत्र्यांना धारेवर धरण्यात आले आहे.

‘आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में ’ महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. आमदारांची घरे पेटवून देण्यात आली असून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याचे प्रकार घडले आहेत. बससेवा विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका आरोग्य, शिक्षण आणि इतर सेवांना बसतोय.

अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत. तर ते छत्तीसगडमध्ये भाजपाचा प्रचार करण्यात बिझी आहेत. भाजपाच्या नेत्यांना २४ तास केवळ राजकारण करायची हौस असते. जनतेच्या सुख-दु:खाशी त्यांना काही देणेघेणे नाही, अशा शब्दांत पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
इतकेच नाही तर पटोले यांनी या अशा असंवेदनशील गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा काडीचाही अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंचा घणाघात
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR