सोलापूर : जिल्हा कारागृहातील पोलिस विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब गंभीर असून, या प्रकरणी चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी कोळपे यांच्या पत्नी सविता कोळपे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला.
जिल्हा कारागृह येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेले विकास कोळपे यांनी ९ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्याजवळील एस.एल.आर. रायफलने छातीवर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व त्यांनी त्यांचे व्हाट्सअप वर स्वतःचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट करून गोळ्या झाडून घेतल्या होत्या. पोलिस विकास कोळपे यांनी मुख्यालयाकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता; पण वरिष्ठांकडून त्यांना न्याय मिळत नव्हता, असं त्यांच्या नातेवाइकांच म्हणणे आहे.