27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरस्त्री अत्याचार विरोधात उदगीर येथे रॅली

स्त्री अत्याचार विरोधात उदगीर येथे रॅली

उदगीर : प्रतिनिधी
फलटण येथील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीना शिक्षा झाली पाहिजे या मागणीसह महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व इनरव्हील क्लबसह अन्य सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून रॅली काढण्यात आली.
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, इनरव्हील क्लब उदगीर,  स्वामी विवेकानदं महाविद्यालय उदगीर, मातृभूमी महाविद्यालय उदगीर, स्त्री रोग डॉक्टर असोसिएशन उदगीर, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर आदी संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या महिला अत्याचार विरोधात  रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरीकानीं उत्साहाने सहभाग नोंदवला.
सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरूवात झाली.  सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात फलक, बॅनर घेत महिला सुरक्षा आणि समानतेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप कार्यक्रमात वक्त्यानीं कडक कायदे, समाजातील जागरूकता आणि सामूहिक जबाबदारीची गरज व त्यावर भर दिला. तसेच महिलासाठी सुरक्षित वातावरण निर्माण ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
या रॅलीत रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हालकीकर, महानंदा सोनटक्के, मंगला विश्वनाथे, ज्योती चौधरी, रजनी उस्तुरे, व्ही. एस. कणसे, चंद्रकांत ममदापुरे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्ष स्वाती गुरुडे, माजी अध्यक्षा मीरा चंबुले, रोहिणी चाटे, डॉ. प्रियंका राठोड, डॉ. सुप्रिया जगताप, भाग्यश्री स्वामी, अंबिका बावगे, डॉ. सुप्रिया सोनटक्के, डॉ. दीपिका कल्पे, पूजा मोगले, पूजा मुडपे, कल्पना पिंगळे, कविता डोंगरगे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती स्वामी,  ज्योती तारे, प्रा. नागसेन तारे, प्राचार्य फ्लोरे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी उस्तुरे, नेहा वाघमारे, प्रतीक्षा काकरे, मिरा बिरादार, उषा सताळकर, ओंकारे जगदीशा यांच्यासह स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सीगचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मातृभूमी महाविद्यालय, उदगीर, मातृभूमी नर्सिंग स्कूल, उदगीर, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, उदगीरच्या विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षक उपस्थित होते.
फोटो ९

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR