26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeसोलापूरउच्चशिक्षित तरुणीची भरमंडपात आत्महत्या

उच्चशिक्षित तरुणीची भरमंडपात आत्महत्या

सोलापूर : सोलापूर शहरातील हत्तूरे वस्ती जवळील कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. सालिया मेहबूब शेख राहणार ओम नमः शिवाय नगर, सोलापूर या उच्चशिक्षित तरुणीने भरमंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी सालिया शेखला हळद लागली होती आणि सोमवारी तिचे लग्न होणार होतं घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा माहोल असताना ही धक्कादायक घटना घडली. तिने राहत्या घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत सालिया शेख हिने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की, मला समीर चांद साब शेख, सलमान पीरसाब शेख, आणि वशिम शेख सर्व राहणार कुमठे यांनी सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद केली आहे.

जो पर्यंत या तिघा इसमांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे. दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR