मुंबई : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघात केल आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. ठाकरेंनी सकाळी पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर मुख्यमंर्त्यांनी दिलं.
मराठी बाण्यावर आणि मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे मराठा समाजाला आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम देवेंद्रजी आणि आम्ही केलं.
पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होतं? उपसमितीचं अध्यक्ष कोण होतं? असा सवाल करत यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. त्यामुळं मराठा समाजाचे खरे मारेकरी तुम्ही आहात. त्यामुळं तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.