31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रजीवे मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार 

जीवे मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार 

मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कोणाला मारुन टाकण्याचा प्रयत्न , कोणाची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते सहन केले जाणार नाही. त्यांच्यावर जीवे मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं ते म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

घर जाळण्याचा जो प्रयत्न झाला आहे. त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. ५० ते ६० लोकांची ओळख पटली आहे. इतर लोकांची ओळख केली जात आहे. या सर्व लोकांवर पोलिस ३०७ च्या अंतर्गत जीवे मारण्याच्या कलमांतर्गत कारवाई करणार आहेत, ंिहसा होत असताना पोलिस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

दुर्दैवाने अशा प्रकारची हिंसा होत असताना काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. याची माहिती लवकरच समोर येणार आहे. बीडमध्ये काही घरं जाळण्याचे, विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याचे प्रकार घडले आहेत. काहींचे हॉटेल, दुकाने, हॉस्पिटल जाळण्याचे प्रकार घडले आहेत, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

हिंसाचार करणा-यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरु झालंय त्यासंदर्भात सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आरक्षणाबाबत कटिबद्ध असल्याचं सांगितली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असंही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR