25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरसाडेचार लाख ग्राहकांनी केला नव्वद कोटींचा भरणा

साडेचार लाख ग्राहकांनी केला नव्वद कोटींचा भरणा

लातूर : प्रतिनिधी

महावितरणने ग्राहकाभिमूख पाऊल टाकत वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपसह विविध सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे वीजग्राहकही ऑनलाईन्­ वीजबील भरण्यास वाढती पसंती देत आहेत. गेल्या दिड महिन्यात लातूर परिमंडलातील सुमारे चार लाख ६० हजार ५८९ वीजग्राहकांनी ८९ कोटी २१ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. वीजबिलात मिळणारी सवलत आणि बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरणा सुविधेस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ऑनलाईन व गोग्रीन सुविधेचा लाभ घेतलेला नाही अशा ग्राहकांनी वीजबिल ऑनलाईन भरुन सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

महावितरणने ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच बील भरण्यासाठी नेट बँंिकग, क्रेडिट, डेबिट कार्डसह विविध मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने वीजबिल ऑनलाईन भरण्यास ग्राहक पसंती देत आहेत. लातूर परिमंडलांतर्गत येणा-या बीड, धाराशिव व लातूर जिल्हयातील २ लाख ९६ हजार ५७३ वीजग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ५८ कोटी ३८ लाख रूपयांच्या वीजबीलांचा ऑनलाईन भरणा केला आहे.

यामध्ये लातूर जिल्हयातील १ लाख ४१ हजार ३७५ वीजग्राहकांनी २७ कोटी ७८ लाख रुपयांचा वीजबील भरणा केला आहे. तसेच बीड जिल्हयातील ८२ हजार १५९ वीजग्राहकांनी १७ कोटी ३२ लाख रूपयांचे वीजबील ऑनलाईन भरले आहे. तर धाराशिव जिल्हयातील ७३ हजार ३९ वीजग्राहकांनी १३ कोटी २८ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या १७ दिवसात हाच आलेख वाढत जावून लातूर जिल्हयातील ७९ हजार ५६५ वीजग्राहकांनी १५ कोटी ३५ लाख, बीड जिल्हयातील ४३ हजार ७८५ वीजग्राहकांनी ८ कोटी ८५ लाख रूपये तर धाराशिव जिल्हयातील ४० हजार ६६६ वीजग्राहकांनी ६ कोटी ६३ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. दिवसेंदिवस वीजग्राहक वीजबील भरणा केंद्रासमोरील रांगा टाळत ऑनलाईन सेवेला प्राधान्य देत आहेत.

ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बँंिकग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास सेवा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते. वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR