लातूर : प्रतिनिधी
राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान गळीत हंगाम २०२५-२६ मधील उत्पादीत ११,११,१२१ व्या साखर पोत्याचे पुजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले. यावेळी मांजरा परिवारातील संस्थांचे चेअरमन संचालक, अधिकारी उपस्थित
होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याचे कर्मचारी यांनी १०१ दिवसांत उत्तम गाळप केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व कारखान्यातील कर्मचारी यांना त्रिपक्षीय करारानुसार ठरलेली १० टक्के पगार वाढ लागू करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले व कारखान्याने चालु गळीत हंगामाचे गाळप दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी चालु झाले असुन कारखान्याने दि. २६ फेबु्रवारी २०२६ अखेर १०१ दिवसांत कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर करुन ६,७२,२५० मे. टन गाळप करुन बी हेवी मोलसेस व सिरप इथेनॉलसह सरासरी १२.२८ टक्ेक साखर उता-यासह ५,५२,८०० क्विंटल साखर उत्पादीत केली कारखान्याचे आसवाणी प्रकल्पही सुरु आहे यामध्ये १,१५,४९,४७२ लिटर इथेनॉल उत्पादन व तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातुन २,३१,१०,००० युनिटचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी कार्यक्रमास विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, बाजार समिती सभापती जगदीश बावणे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव ठाकुर (देशमुख), उपाध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, माजी उपाध्यक्ष तथा संचालक श्रीशैल्य उटगे, संचालक, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, सर्वश्री मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत ऊफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरु कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, अरुण कापरे, विलास चामले, शंकरराव बोळंगे, अनिल दरकसे, बालाजी पांढरे, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, शत्रुघ्न पाटील, तानाजी जाधव, कार्यकारी संचालक पंडित देसाई, शेतकरी सभासद व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

