अहमदपूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाजला आरक्षण मिळायला पाहिजेत. यासाठी शासनाने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. यासाठी मुंबई येथील मंत्रालयाच्या समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजाला ओबीसीमधून टिकणारे व सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार बाबासाहेब पाटील व त्यांचे अन्य सहकारी सदस्य हे लाक्षणिक उपोषणास बसले आहेत.
यावेळी एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा ही देण्यात आल्या.अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना समर्थन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणासाठी समाजाच्या महीला, युवक, वयस्क मंडळीही रस्त्यावर उतरले आहेत. उद्रेक होऊ नये यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी एक मराठा-लाख मराठा, याबरोबरच आरक्षण आमच्या हक्काचे अशी घोषणाबाजी करण्यात आली. आमदार बाबासाहेब पाटील आणि अन्य सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली.