22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीपेंडू येथील रक्तदान शिबिरात १०० जणांचे रक्तदान

पेंडू येथील रक्तदान शिबिरात १०० जणांचे रक्तदान

पालम : तालुक्यातील पेंडू येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे दि.२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल १०० रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केले.

पालम पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचे भव्य मंदिर असून या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. याही वर्षी भव्य कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले आहे.

यावर्षी रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील साखरे, सरपंच निवृत्ती धुळगुंडे, देवबा धुळगंडे, माधव धुळगंडे, जनार्धन महाराज, पंडीत धुळगडे आदींची उपस्थिती होती. मंदीर समितीतर्फे रक्तदान करणा-या रक्तदात्याला ज्यूस, सफरचंद देण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गावकरी याच्यावतीने परिश्रम घेण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR