महाराष्ट्राच्या मतदारयादीतील ‘फुगवटा’ फुटणार?; १ कोटी नावे वगळण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदारयादी पुनरिक्षण मोहिमेमुळे राज्यातील मतदारसंख्येतील मोठा ‘फुगवटा’ फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आगामी सखोल विशेष फेरतपासणी मोहिमेतून राज्यातील सुमारे ९० लाख ते १ कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जाऊ शकतात. या प्रक्रियेत प्रामुख्याने दुबार, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे बाद होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ८८ लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. निवडणूक आयोग ३० जूनपासून राज्यभर ‘सखोल विशेष फेरतपासणी’ मोहीम राबवणार असून, त्याआधी ‘एसआयआर पूर्व सर्वेक्षण’ सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान विद्यमान मतदारांची माहिती २००२ मधील सघन पुनरिक्षण मोहिमेतील मतदारयादीशी जुळवून पाहण्याची (मॅपिंग) प्रक्रिया सुरू आहे.

विशेषत: मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई या मोठ्या शहरी भागांमध्ये मतदारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्यामुळे मॅपिंगची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. मुंबई शहरात सुमारे ५५ टक्के, तर मुंबई उपनगरात केवळ ४७ टक्के मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच भागांतून सर्वाधिक मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या मुंबईत सुमारे १ कोटी ४ लाख, पुण्यात ९१ लाख ४० हजार आणि ठाण्यात ७५ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचे मूळ गाव आणि वास्तव्यास असलेले शहर अशा दोन्ही ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यात दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे मानले जात आहे.

याशिवाय, अनेक मतदारयाद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावे अद्याप कायम असल्याचेही समोर आले आहे. कुटुंबीयांकडून मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी अर्ज न केल्याने ही नावे वर्षानुवर्षे यादीत कायम राहिल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निवडणूक यंत्रणा व्यग्र राहिल्याने वार्षिक विशेष संक्षिप्त पुनर्तपासणी प्रक्रिया प्रभावीपणे राबवली गेली नव्हती. त्यामुळे स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची छाननी होऊ शकली नव्हती. आता एसआयआर मोहिमेद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया व्यापक स्तरावर केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ७० टक्के लोकसंख्या प्रौढ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यानुसार विद्यमान मतदारसंख्येमध्ये विसंगती असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मोहिमेत केवळ नावे वगळली जाणार नसून, गेल्या वर्षी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नव्या पात्र मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होण्याचीही शक्यता आहे. २००२ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सघन पुनरिक्षण मोहीम राबवली जात असल्याने राज्यातील मतदारयादीत मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING : वाशीत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
01:03
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07

Latest news