नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ख्रिसमसच्या संबंधित एका कार्यक्रमात बोलताना देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर बलिदान दिलेल्या शूर सैनिकांचे स्मरण केले. ते म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी पूंछ राजौरी सेक्टरमध्ये आमच्या शूर जवानांनी आमच्या सुरक्षेसाठी कठोर परिश्रम घेतले होते. त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. ख्रिसमस साजरा करताना देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना विसरू नये. सीमेवर जे या थंडीच्या दिवसात आपले जीवन जगत आहेत आणि आपले संरक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत, त्यांना आपण विसरू नये. त्यांच्यामुळेच आपण कुटुंबियांसोबत आनंदोत्सव साजरा करू शकतो, असे ते म्हणाले.
सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की, आम्ही सर्व भाग्यवान आहोत. सैनिकांमुळे कुटुंबियांसोबत आनंदोत्सव साजरा करू शकतो. देशासाठी काम करायचे आहे हे विसरता कामा नये. सरन्यायाधीशांनी असेही सांगितले की, त्यांनी सरकारला जमीन देण्याची विनंती केली होती, जी मंजूर झाली आहे. आता या जमिनीवर वकिलांसाठी नवीन चेंबर्सही बांधण्यात येणार आहेत. त्यांनी सांगितले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले होते, त्याआधी प्रत्येकजण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होता.