लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक

पुण्यातील भौतिकशास्त्राचा प्राध्यापकही जाळ््यात, सीबीआयची मोठी कारवाई
पुणे : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असून या प्रकरणी सीबीआयचे राज्यात मोठ्या कारवाईचे सत्र सुरू आहे. या प्रकरणी आता आरोपी प्रा. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने नंबर सेव्ह असलेल्या पुण्यातील एका क्लासमधील भौतिकशास्त्राचा प्राध्यापक तेजस शाह आणि लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे या दोघांना सीबीआयने अटक केली. या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे.

पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरचा प्राध्यापक तेजस शाहला मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राची फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे तर डॉ. मनोज शिरुरेवर या प्रकरणातील आरोपी मोटेगावकरच्या मुलासह ३ विद्यार्थ्यांना पी. व्ही कुलकर्णीकडून रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर लीक झालेले प्रश्नही विद्यार्थ्यांना विकल्याचा संशय आहे. या आधी सीबीआयने लातूर येथील सिद्धिविनायक बाल रुग्णालयात जाऊन डॉ. मनोज शिरुरेची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली. त्यामुळे लातुरात खळबळ उडाली.

यासोबतच पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरचा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक तेजस हर्षदकुमार शाह याच्या कार्यालयाची झाडाझडती घेऊन मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतली. तसेच काही कागदपत्रेही जप्त केल्याची माहिती आहे. त्याने या प्रकरणात अटक झालेल्या मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर मिळविल्याची माहिती समोर आली आहे. तेजस शाह याचा मोबाईल नंबर मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह आहे. त्याला अटक झाल्याने आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. सीबीआय न्यायालयाने आता शाह याला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड ठोठावली आहे.

सीबीआयने आतापर्यंत देशभरातील ४९ ठिकाणी छापे टाकले असून तपासात अनेक कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. यात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत १३ आरोपी अटक करण्यात आली. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट आणि कटकारस्थान उघड करण्यासाठी सीबीआय कसून तपास करीत आहे. लातूरमध्येही सीबीआयचे पथक तळ ठोकून असून, सध्या लातुरात कसून तपास सुरू आहे. विशेषत: आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे अधिक लक्ष आहे.

सीबीआयने आतापर्यंत ५ डॉक्टर्स, ४ विद्यार्थी आणि अनेक पालकांची चौकशी पूर्ण केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि संशयास्पद बँक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत. आता या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी काही नामांकित क्लासेसचे चालक आणि डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता असून सीबीआय या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत आहे.

आरोपींचे थेट पेपर लीक
करणा-या सूत्रधारांशी कनेक्शन!
नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये अडकलेल्या लातूरच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे आणि तेजस शाह या प्राध्यापकाचे कनेक्शन थेट पेपर लीक करणा-या मुख्य सूत्रधारांशी जोडले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील एका मुख्य संशयिताने तर तेजस शाहचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह केला होता. तेजसने मनीषा हवालदारकडून थेट प्रश्नपत्रिका मिळविल्याचा प्राथमिक संशय आहे. तसेच डॉ. शिरुरेही या नेटवर्कमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचा संशय आहे.

आणखी ४ डॉक्टर रडारवर
नीट पेपरफुटी प्रकरणी बडे मासे गळाला लागल्यानंतर सीबीआयचे पथक लातुरात तळ ठोकून असून, येथे मिळालेल्या धागेदो-याआधारे कसून तपास सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणी लातूरचे एकूण ५ डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत. यापैकी लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता आणखी ४ डॉक्टर सीबीआयच्या रडारवर असून, त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रा. मोटेगावकरची
मालमत्ता अनधिकृत!
लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याची खोपेगावात मोठी इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामाला स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिका-यांकडून रितसर परवानगी न मिळविताच टोलेजंग इमारत उभारल्याची माहिती समोर आली. आता याीबाबत जिल्हाधिकारी ठोस निर्णय घेऊन बुलडोझर चालविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१० दिवस आधीच
नीट पेपर फुटला
मोटेगावकरच्या मुलाची कबुली
नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या कोठडीत आहे. या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे अधिकाधिक पसरत चाललेअसून, नीट परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी नीटचा पेपर वडिलांनी माझ्या हातात दिल्याचे प्रा. शिवराज मोटेगावकरच्या मुलाने सीबीआयला तपासादरम्यान सांगितले.दरम्यान, प्रा. मोटेगावरच्या मुलास माफीचा साक्षीदार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे.

 

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news