नांदेड : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला .. नांदेड शहरातील साठे चौक परीसरात ही घटना घडली. या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. सकाळी नांदेडहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नायगावकडे निघाला. शिव संवाद दौऱ्यानिम्मित नायगाव येथे खासदार शिंदे हे पक्षाच्या आढावा बैठकी निघाले होते. शहरातून निघाल्यानंतर.
साठे चौक येथे त्यांच्या ताब्यातील एका वाहनासमोर एक व्यक्ती अचानक आला. त्यामूळे चालकाने ब्रेक मारला. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मागच्या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कुणालाही दुखापात झाली नाही. वाहनांचे मात्र नुकसान झाले. अपघात ग्रस्त गाड्यांमध्ये काही कार्यकर्ते आणि आरोग्य विभागातील काय कर्मचारी होते अशी माहिती आहे.
















