नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी (१ नोव्हेंबर) दुपारी १२:२२ च्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मूच्या डोडा येथे जमिनीपासून ५ किलोमीटर खोल होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी नोंदवण्यात आली आहे.