खरीप हंगामात कृषि विभागाचा कडधान्यावर भर

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांकडून मशागतीची कामे सध्या अंतिम टप्यात आहेत. कृषि विभागानेही खरीम हंगामासाठी बी-बियाणे, खते विक्रीसाठी उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतक-यांना बिजोत्पादन प्रक्रीया कशी करावी याचेही प्रत्यक्षिक स्वरूपात गावोगावी मोहिमेच्या माध्यमातून दिली जात आहे. विशेष म्हणजे कृषि विभागाने मूग, उडीद, तूर या कडधान्याच्या पे-यावर अधिक लक्ष दिले जात असून शेतक-यामध्येही याची जनजागृती करण्यात येत आहे.
खरीपाच्या पेरणीपुर्व शेतातील मशागतीची कामे शेतक-यांनी हाती घेतली असून ती अंतीम टप्यात आहेत. शेतकरी अधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे पूर्ण करत आहेत. तर ज्या शेतक-यांकडे बैल बारदाना आहे. त्यांनी सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतात नांगरनी, मोगडा, कुळव चालवत मशागतीची कामे करत आहेत. पावसाळा ८ ते १० दिवसावर येऊन ठेपल्याने शेतक-यां शेतीची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ८५ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ७१ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर तुर, ७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर मुग, ७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर उडीद, ५ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ५११ हेक्टरवर बाजरी, २ हजार हेक्टर ५८४ क्षेत्रावर मका, ६० हेक्टरवर साळ, २२७ हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, २४६ हेक्टर क्षेत्रावर तीळ, ५ हेक्टरवर सुर्यफूल आदी पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच १४ हजार १४४  हेक्टर क्षेत्रावर कापूसाची लागवड पेरणी होणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
गेल्या वर्षी ५,८८,९९६ हेक्टरवर खरिपाचा पेरा
जिल्ह्यात गेल्यावर्षी ५ लाख ८८ हजार ९९६ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. यात सर्वाधिक ४ लाख ८५ हजार १८१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ७० हजार ६६७ हेक्टरवर तूर, ७ हजार ९९७ हेक्टरवर मूग, ६ हजार १८३ हेक्टरवर उडीद, २ हजार ८४९ हेक्टरवर ज्वारी, २४५ हेक्टरवर बाजरी, १ हजार ८२४ हेक्टरवर मका, साळ ५९ हेक्टवर, २२२ हेक्टरवर तिळ, १५९ हेक्टरवर भूईमुग, सुर्यफूल ५ हेक्टर, कारळं ६० हेक्टरवर अशा प्रकारे १००.४९ टक्के क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला होता.
खरीप जनजागृतीच्या ४ हजार मोहिमा
लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारी शेतक-यांकडून सुरू आहे. त्यासाठी कृषि विभागाने बियाणे उगवण शक्ती तपासणे, बिज प्रक्रीया करणे, अशा स्वरूपाचे उपक्रम सध्या जिल्हाभर सुरू आसून ३५५ अधिकारी व कर्मचा-यांनी ४ हजार २१ मोहिमा पार पाडल्या आहेत. या अधिका-यांकडून मेळावे, खरीपाच्या संदर्भाने दि. १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत मोहिमा घेऊन खरीप हंगामातील पेरणीच्या संदर्भाने उपाय योजना केल्या जात असल्याचे कृषि विभागाने सांगीतले.
मूग, उडीद, तुरीचा पेरा वाढविण्यावर भर
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात दरवर्षी सोयाबीनचा अधिक पेरा होता. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र २ हजार हेक्टरने कमी करून मूग, उडीद, तूर यांच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन केले आहे. तसेच एल निनोच्या धर्तीवर विशेष मोहिम घेऊन काय उपाय योजना करायच्या याचे नियोजन केले आहे. यात उताराच्या शेतीमध्ये आडवी पेरणी ३० टक्के क्षेत्रावर करणे, बीबीएफ रूंद सरी वरंबा पध्दतीने २० टक्के क्षेत्रावर पेरणी करणे, ५ टक्के क्षेत्रावर मृत सरी काढणे, १० टक्के क्षेत्रावर टोकण पध्दतीने बियाणांची लागवड करणे या संदर्भाने शेतक-यांना मार्गदर्शन केले जात आसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.
‘एल-निनो’ च्या प्रतिकूल परिणामाची शक्यता
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तर यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’ चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणा-या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्या लागण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news