16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयविरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याची भाजपची योजना

विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याची भाजपची योजना

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी नेत्यांना अटक करण्याची भाजपची योजना आहे. त्यांना रिकाम्या देशात स्वत:साठी मते हवी आहेत. मनरेगा प्रकरणातही ममता यांनी सरकारला इशारा दिला. १६ नोव्हेंबरपर्यंत मनरेगाची थकबाकी भरली नाही, तर आम्ही पुढचे पाऊल जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सुमारे ७ हजार कोटी रुपये केंद्राकडे प्रलंबित आहेत. गरीब ग्रामीण जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्लीत आमच्या शिष्टमंडळाची भेट घेतली नाही. आता पैसे देण्यास आणखी विलंब झाल्यास आमचे आंदोलन शिगेला पोहोचेल.

तसेच ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अनादर केल्याची तक्रार मुंबईतील न्यायालयाने फेटाळली आहे. राष्ट्रगीत म्हणणे म्हणजे ते गाणे असे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. महानगर दंडाधिकारी (माझगाव न्यायालय) एसबी काळे यांनी तक्रार फेटाळताना सांगितले की, कार्यक्रमाच्या व्हीडीओ ममता बॅनर्जी राष्ट्रगीत सुरू असताना अचानक बाहेर जाताना दिसल्या नाहीत. न्यायालयाचा सविस्तर आदेश बुधवारी उपलब्ध झाला. राष्ट्रगीताचे काही शब्द किंवा ओळी गाणे आणि वाचणे या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा एकमेकांशी संबंध जोडता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR