पंढरपूर: कमला एकादशीच्या निमित्ताने पंढरी झाली विठ्ठलमय; भक्तीचा महापूर

पंढरपूर (दिनेश खंडेलवाल) : पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिन्यातील दुसऱ्या कमला एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर अक्षरश: भक्तीच्या लाटेत न्हाऊन निघाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण पंढरी नगरी ‘जय हरी विठ्ठल’च्या गजराने दुमदुमून गेली आहे.

वारकरी संप्रदायामध्ये अधिक महिन्यातील कमला एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पर्वाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकरी भाविकांनी चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान करण्यासाठी अलोट गर्दी केली होती. चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शन हा वारकऱ्यांच्या श्रद्धेचा मुख्य केंद्रबिंदू असल्याने, पहाटेपासूनच भाविकांची मोठी ओढ पाहायला मिळाली.

पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर आज भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. विविध संतांच्या दिंड्या, हातात टाळ-मृदुंग आणि खांद्यावर पताका घेऊन भाविक हरिनामाचा जयघोष करत प्रदक्षिणा पूर्ण करत होते. ‘अधिकंम अधिकस्य’ या उक्तीप्रमाणे, अधिक महिन्यात केलेल्या भक्तीचे फळ अधिक मिळते, या श्रद्धेने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या विठ्ठलाची पूजा करून वारकरी उपवास करतात. कमला एकादशीचे व्रत अतिशय नियम, श्रद्धा आणि विश्वासाने पाळले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार, या व्रताचे फळ हे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या आणि तीर्थयात्रेपेक्षाही अधिक पुण्यदायी मानले जाते. याच फलश्रुतीच्या आशेने यंदाच्या अधिक महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज लाखांच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत.

चंद्रभागा वाळवंट परिसर, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखातून निघणारा हरिनामाचा गजर आणि मृदुंगाच्या तालावर होणारे नामस्मरण यामुळे संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. उपवास आणि नामस्मरणाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीची कामना करत प्रत्येक वारकरी आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला दिसून आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17
Video thumbnail
Latur Accident|खंबाळवाडीजवळ भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले प्राण
01:01
Video thumbnail
Ambadas Danve On Devendra Fadnavis|मुख्यमंत्र्यांनी दिलेला बैल आजारीच!" दानवेंचा गंभीर आरोप
04:52
Video thumbnail
Latur|ठाकरे गटाच्या बैठकीतच राडा; व्यासपीठावर शिवसैनिक भिडले!
00:53
Video thumbnail
'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला कंगना रणौतची ग्लॅमरस हजेरी!
00:42
Video thumbnail
जेव्हा सचिन तेंडुलकर विमानातच क्रिकेट खेळू लागला...!
00:42
Video thumbnail
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण: अंबाबाई मंदिराच्या शिखरावर झळकणार अडीच कोटींचा सुवर्णकळस
00:43
Video thumbnail
Latur Accident|निटूरमध्ये भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
01:12
Video thumbnail
Latur Farmar News|पत्नीसोबत स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला अखेर मिळाला बैल!
01:38
Video thumbnail
Latur -बसस्थानकात सोनसाखळी चोरणारी महिला काही तासांत जेरबंद! #marathilivenews #Latur #police
00:41
Video thumbnail
Bus Accident|उदगीर-अहमदपूर मार्गावर मोठा अपघात#marathilivenews #maharashtranews #breakingnews
01:18
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08

Latest news