फसव्या कर्जमुक्तीच्या शासन आदेशाची होळी 

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना विनाअट सरसगट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास समर्थन देत लातुरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी शासनाच्या फसव्या कर्जमुक्तीच्या शासनादेशाची होळी करण्यात आली.
राज्य सरकारने नुकताच कर्जमुक्तीचा शासनादेश काढला असून त्यात अनेक जाचक अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असल्याने शेतक-यांची घोर फसवणूक केलेली आहे. शेतक-यांना याचा कसलाच फायदा होणार नाही. उद्योगपतीचे लाखों कोटींचे कर्ज विना अट माफ केलं जात असताना शेतक-यांना मात्र जाचक अटी घालून उध्वस्त करायचं काम सरकार कडून सुरु आहे. जाती जातीत भांडण, धर्मा धर्मात भांडण लावून शेतक-यांच्या प्रश्नावर एकत्र येऊ देऊ नये असा डाव सरकार खेळत आहे.पीकविमा नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. याचे सरकारला काहीही देणे घेणे राहिलेले नाही.
रविकांत तुपकर बेमुदत अन्न त्याग आंदोलनास बसलेले असून त्यांच्या जीविताचे बरे वाईट होण्याची वाट सरकार बघत आहे की, काय असा सवाल सुद्धा महाराष्ट्रतील जनता करीत आहे. संघटना फोडाफोडी पक्ष फोडा फोडी, असे अनेक प्रयोग करुन त्यात सरकार यशस्वी झाले आहे. परंतु शेतकरी कष्टकरी एकजूट होऊन सरकारचे मनसुबे उधळून लावतील. आता लढाई आरपारची असेल, शेतक-याच्या नादाला सरकारने लागू नये, असा इशारा आंदोलकांनी देत तात्काळ सरसगट विना अट कर्जमुक्ती करुन हक्काचा पीकविमा द्यावा आणि रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा गणिमी काव्याने राज्यात काही ही घडेल याची जबाबदारी सरकारवर असेल.
या आंदोलनात राजीव कसबे, सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, नवनाथ शिंदे, प्रज्योत हुडे, शाम जाधव, सतीश राठोड, इमाम सय्यद, विशाल ढोबळे, बालाजी सूर्यवंशी, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, आदेश कसबे, बालाजी हौळ पाटील, मारुती कसबे धनराज घुटे, सावन गवळी, शिवाजी कसबे, प्रवीण गायकवाड,सतीश चोरमले, एम. एम. जगताप, बबलू शेख, आकाश घुटलकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news