भाजपचा ‘कलंकित बहुमत’ मिळवण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला तीव्र विरोध करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. भाजप चुकीच्या मार्गाने दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन या विधेयकाला विरोध करतील. जर विद्यमान जागांमध्येच एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले जात असेल तरच काँग्रेस विधेयकाला पाठिंबा देईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस सर्व विरोधी पक्षांच्या संपर्कात असल्याचे रमेश यांनी सांगितले. भाजपकडे लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याची ताकद नाही आणि असे करण्याचा प्रयत्न म्हणजे कलंकित बहुमत ठरेल. लोकसभेत खासदारांची फोडाफोड करूनही सरकारकडे आवश्यक आकडा नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच, चंदा चोरी, पेपर लीक प्रकरण, इथेनॉल घोटाळा, अमेरिकेसोबतचा करार आणि परराष्ट्र धोरण यांसारख्या गंभीर मुद्यांवर ‘इंडिया’ आघाडीसोबत मिळून सरकारला धारेवर धरणार असा इशाराही त्यांनी दिला.
दोन तृतीयांश बहुमताबाबत पसरवल्या जाणा-या अफवांचे खंडन करत, डीएमके आणि आम आदमी पक्षासह सर्व सहयोगी पक्षांशी आम्ही संपर्कात असल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. सरकार दोन तृतीयांश बहुमतापासून अजूनही खूप दूर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात १० ऑगस्टपर्यंत जेपीसीचा अहवाल येणार असला, तरी ही संकल्पना संविधानविरोधी असल्याने काँग्रेस तत्त्वत: तिचा विरोध करेल, असेही जयराम रमेश म्हणाले. येत्या सोमवारपासून म्हणजेच २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची सोमवारी नियोजित बैठक आहे तर, सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news