वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरला लाखो वारकरी-भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा व स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी-भाविकांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी…..
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वाळवंट तसेच नदीपात्रालगतच्या शौचालयांची पाहणी केली. त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का, स्वच्छता राखली आहे का, याची तपासणी केली. काही शौचालये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उघडून पाहणी केली.

शौचालयांच्या साफसफाईसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, तसेच शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कचरा पडू नये यासाठी कचकडा टाकावा, नदीपात्र कायम स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, तसेच तेथे पडणारा कचरा इतरत्र पसरू नये यासाठी कचराकुंड्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

होडीचालकांशी संवाद…..
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वाळवंट व परिसराची पाहणी करताना नदीपात्रातील होडीचालकांशी संवाद साधला. आसनक्षमतेपेक्षा जास्त जलप्रवाशांची वाहतूक करू नये, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर जलवाहतूक बंद ठेवावी, असे त्यांनी सांगितले. जलवाहतुकीदरम्यान प्रवासी व चालक यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

यावेळी त्यांच्या समवेत प्रांत अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, जलसंपदा विभागाचे अधिकारी, उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news