गांजा शेती प्रकरणातील आरोपी पोलिसांनी केला जेरबंद

किल्लारी : वार्ताहर
लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध लागवड व तस्करीविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलिसांनी सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या गांजा शेती प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक केली आहे.  या प्रकरणी कि ल्लारी पोलीस ठाणे गु.र.नं. २५३/२०२५, कलम ८(क), २०(ब)(क) अमली पदार्थ व मनप्रभावी पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात आरोपीने नांदुर्गा तांडा येथील स्वत:च्या शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ८० किलो वजनाचा व अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
दरम्यान, गुप्त माहितीदारामार्फत आरोपी रामराव दगडू पवार (रा. नांदुर्गा तांडा, ता. औसा, जि. लातूर) हा नांदुर्गा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती किल्लारी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध  सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष सूचना दिल्या असून, त्या अनुषंगाने जिल्हाभर प्रभावी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत फरार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही यशस्वी कार्यवाही पोलिस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव, पोलिस अमलदार कृष्णा गायकवाड, बालाजी फावडे, दत्ता जाधव, रविशंकर करके, आकाश सरतापे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news