लातूर : एम. जे. हॉस्पिटलचे संचालक, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बुधवारी समोर आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून गुरूवारी डॉ. मेहुल राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते.
लातूर-अंबाजोगाई मार्गावरील अगत्य हॉटेलच्या जवळ डॉ. राठोड यांची कार संशयास्पद अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर त्यांच्या पार्थिवाची उत्तरणीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईक दु:खात असल्यामुळे अधिक तपास करता आला नाही. मात्र इतर बाबांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
















