श्रीक्षेत्र गुंज येथील संत कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तसंप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने परभणीसह मराठवाडाभरातील भाविकांमधून हळहळ व्यक्त होत असून, श्रीक्षेत्र गुंज येथे शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेले कालिदास महाराज आपल्या सहका-यांसह गुंजकडे परत येत होते. यावेळी बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कालिदास महाराज यांच्यासह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कालिदास महाराज यांनी गेली ४ दशके अखंड मौनव्रताचे पालन करत अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनाचा अनोखा मार्ग स्वीकारला होता. दत्त संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी राज्यभर असंख्य भक्तांना आध्यात्मिक जीवनाची दिशा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्याने त्यांच्याबद्दल समाजात विशेष आदराची भावना होती.

भाविकांवर शोककळा,
मंत्र्यांकडून श्रद्धांजली
मौनव्रत असूनही त्यांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे येत असत. त्यांच्या आशीर्वादातून आणि साध्या, संयमी जीवनातून अनेकांना अध्यात्माची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाविकांमध्ये दु:खाची लाट पसरली असून, सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही महाराजांना श्रद्धांजली वाहिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10
Video thumbnail
Nanded Teacher sucide|धक्कादायक! शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप
03:56
Video thumbnail
संत गजानन महाराजांच्या पालखीचे तुळजापुरात भक्तिमय वातावरणात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
01:54
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32

Latest news