आयटी इंजिनिअर तरुणीचा गूढ मृत्यू

हैदराबाद : येथील एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ वळण मिळाले आहे. एका स्थानिक मंदिरात विवस्त्र होऊन प्रवेश केल्यानंतर देवीची मूर्ती सोबत घेऊन तलावात उडी मारल्याने या तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आता तलावातून गायब झालेल्या देवीच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

तेजस्विनी असे मृत महिला तरुणीचे नाव असून ती आयटी क्षेत्रात काम करत होती. तेजस्विनीने घटनेच्या वेळी अंगावरील सर्व कपडे काढले आणि ती विवस्त्र अवस्थेत जवळच असलेल्या एका मंदिरात दाखल झाली. तिथे तिने गाभा-यातील अम्मारु देवीची मूर्ती उचलली आणि ती सोबत घेऊन जवळच असलेल्या तलावाकडे गेली. त्यानंतर मूर्तीसह तिने तलावाच्या पाण्यात उडी घेतली. काही वेळातच तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह तलावाबाहेर काढला असला, तरी देवीची मूर्ती मात्र अजूनही बेपत्ता आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात ती मूर्ती अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. त्यामुळे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, बोटींच्या साहाय्याने संपूर्ण तलावात मूर्तीचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला आहे. तपासादरम्यान तेजस्विनी राहत असलेल्या फ्लॅटबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती ज्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तिथे ती दररोज सुमारे ३५०० रुपये म्हणजेच महिन्याला तब्बल १ लाख रुपयांच्या आसपास भाडे देत होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे वरचे दोन मजले एका लॉजसारखे बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या लॉज कनेक्शनचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का या दृष्टीनेही पोलिस कसून चौकशी करत आहेत.

आत्महत्येचा संशय; पोलिस तपास सुरू
प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. तेजस्विनीच्या आई अरुणा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच, तेजस्विनीने मृत्यूपूर्वी लिहिलेली कथित चिठ्ठी तिच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार आणि घटनेच्या काही दिवस आधी ती कोणाकोणाला भेटली, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. तेजस्विनीने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्या रात्री नक्की काय घडले, याचा अचूक घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण करत आहोत. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचता आलेले नाही, अशी माहिती तपास अधिका-यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news