सोमवारचा मोर्चा यशस्वी करा

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून देशवासीयांना संदेश दिला आहे. या संदेशामार्फत २० जुलै रोजी प्रस्तावित संसदेवरील मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. उपोषणादरम्यान त्यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनम वांगचुक यांनी हा संदेश त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. संदेशात त्यांनी म्हटले आहे, २० जुलै सोमवारी दुसरी स्वातंत्र्य चळवळ भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत असा त्यांनी एक्सवर संदेश लिहीला आहे.

वांगचुक यांनी पुढे लिहिले अन्यायापासून मुक्ती, भीतीपासून मुक्ती यासाठी भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ सुरू आहे. संसदेवरील मोर्चा यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले. पोस्टच्या शेवटी सफदरजंग येथील माझ्या बेकायदेशीर अटकेतून गीतांजलीमार्फत पाठवलेला संदेश असा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान, गीतांजली आंगमो यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत रुग्णालयात त्यांना पतीला भेटण्यास आणि मोबाईल फोन आत नेण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले.

सोनम वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या आठव्या मजल्यावर उपचार घेत असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रविवार दि. १९ जुलै रोजी सकाळी रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर त्याचे स्पष्ट परिणाम दिसून येत आहेत. व्हीएमएमसी-सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर आणि एम्स, दिल्लीच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचुक यांना २४4 तास वैद्यकीय देखरेख आणि सातत्याने उपचारांची आवश्यकता असून त्यांच्या रक्तातील विविध मापदंडांसह प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news