पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कमच अंतिम राहणार

पुणे : प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील गावपातळीवर प्रसिध्द झालेल्या याद्यांमध्ये व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतक-यांच्या नावासमोर दर्शविलेल्या थकबाकी रक्कम तसेच योजनेच्या पोर्टलवरील रकमेत फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. गाव पातळीवर प्रसिद्ध केलेली यादी व योजनेच्या पोर्टलवरील शेतक-यांच्या थकबाकी रकमेत फरक असल्यास योजना पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राहय धरावी, असे राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी सांगितले.

योजनेच्या पोर्टलवर दिसणारी शेतक-यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम ३१.३.२०२६ रोजीची आहे. शासनाने १.७.२०२६ रोजीच्या पत्रान्वये सर्व बँकांना १.४.२०२६ नंतरच्या व्याजाची रक्कम न आकारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत व सर्व बँकांनी त्या मान्य असल्याचे लेखी कळविले आहे. शेतक-यास योजनेच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास त्यांनी आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतक-यास आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती प्राप्त होणार आहे. या पावतीमध्ये शेतक-याची कर्जमुक्ती होणा-या रकमेची माहिती उपलब्ध आहे.

आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतक-यांचे दिनांक ३१.०३.२०२६ वरील कर्जबाकीच्या लाभाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. उपरोक्त कर्जमुक्तीनंतर शेतक-यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती झाल्यानंतर सर्व कर्जमुक्ती शेतक-यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतक-यांना संबंधित बँकेमार्फत खरीप पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे.
योजनेच्या पोर्टलवरील रक्कम किंवा पोर्टलवरील शेतक-यांच्या कर्जाबाबत इतर कोणताही तपशील शेतक-यास अमान्य असल्यास त्याने पोर्टलवर तक्रारीची नोंद करावी. या तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केले जाईल.

कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध
कर्जमाफी व एकवेळ समझोता घटकाकरिता योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. बँकेमार्फत सादर केलेल्या कर्जखात्यांचे महा-आयटी मार्फत योजना निकषानुसार संगणकीय संस्करण करून २५ जुलै २०२६ रोजी एकूण १६.९६ लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ७.०३ लाख कर्जखाती व व्यापारी बँकांकडील ९.९३ लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news