युद्ध पुन्हा पेटले

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा भडकले आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण हवाई हल्ले सुरू असल्याने आखातात युद्धाचे सायरन वाजू लागले आहेत. २८ फेब्रुवारीला सुरू झालेले युद्ध मधल्या काळामध्ये थांबले होते आणि शांतता करार झाला होता. मात्र त्यानंतर अचानक हा करार मोडला आणि हवाई हल्ले सुरू झाले.

इराणने दोन दिवसांपूर्वी जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला आता अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन सैन्याने बुधवारी उशिरा इराणमधील अनेक महत्त्वाच्या सैन्य तळांवर भीषण हवाई हल्ले केले. अमेरिकन सेंट्रल कमांडने याबाबत माहिती दिली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्याअनेक ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले. मंगळवारी इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणा-या जहाजांवर क्षेपणास्त्रे डागली होती. अमेरिकन सैन्याने इराणची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच यशस्वीरीत्या नष्ट केली. या हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत अमेरिकेने इराणवर मोठा प्रतिहल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याचा इशारा दिला होता.

अत्यंत जोरदार प्रहार करणार
आम्ही इराणावर अत्यंत जोरदार प्रहार करणार आहोत, कारण आता हल्ला करण्याची आमची पाळी आहे. आम्ही काय करणार आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे लष्करी कमांड सेंटर्स, क्षेपणास्त्र आणि ड्रोननिर्मिती केंद्र, किनारी देखरेख यंत्रणा तसेच सागरी युद्धक्षमता असलेल्या तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले केले. हे हल्ले अमेरिकन वेळेनुसार गुरुवारी पहाटे सुरू झाले. जवळपास तासभर हे हल्ले सुरू होते.

आयआरजीसीची कबुली
इराणच्या आयआरजीसीने जॉर्डनमधील अमेरिकन हवाई तळावर हल्ला केल्याची कबुली दिली. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणा-या तीन तेल टँकर्सवरही कारवाई केल्याचा दावा इराणने केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news