जम्मू-काश्मिरात पर्यटकांच्या संख्येत घट

श्रीनगर : आधीच दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या जम्मू-कश्मीरला पहलगाम हल्ल्यामुळे आणखीनच फटका बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली आहे. २०२५ मध्ये जम्मू-कश्मीरमधील परदेशी पर्यटकांसह देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.

२०२५ मध्ये जम्मू आणि कश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. २०२२ च्या तुलनेत, २०२५ मध्ये राज्यात येणा-या देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत अंदाजे २३ टक्के घट झाली, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ४४ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेतील एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. गेल्या दशकात दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्यामुळे आणि बदलत्या परिस्थितीमुळे जम्मू -कश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत होती. मात्र, गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांचा उत्साह पुन्हा मावळला. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये कश्मीरला भेट देणा-या देशांतर्गत पर्यटकांची संख्या ११.३ दशलक्षांपेक्षा जास्त होती, तर परदेशी पर्यटकांची संख्या केवळ २००० होती. त्यानंतर २०२२ मध्ये या संख्येत वाढ होऊन देशांतर्गत पर्यटकांची संख्या ६३.४९ टक्क्यांनी वाढून १८.४ दशलक्षांपेक्षा जास्त झाली. तर परदेशी पर्यटकांची संख्या २०,००० वर पोहोचली. २०२३ मध्ये प्रथमच जम्मू कश्मीरमध्ये एकाच वर्षात २० दशलक्षाहून अधिक पर्यटक आले. २०२४ मध्ये देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. देशांतर्गत पर्यटकांची संख्या २३ दशलक्षांवर पोहोचली, जी ११.२९ टक्क्यांची वाढ होती, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत १८.१८ टक्क्यांची वाढ दिसून आली.

परदेशी पर्यटकांनेही पाठ फिरवली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे २०२५ मध्ये पर्यटकांची वाढती संख्या थांबली. या भीषण हल्ल्यानंतर, देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली. यामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात जवळपास २३ टक्के घट झाली, ही संख्या २३ दशलक्षवरून १७.७ दशलक्ष झाली. परदेशी पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली. ही संख्या ६५,००० वरून ३६,००० पर्यंत, म्हणजेच ४४.६२ टक्क्यांपेक्षा जास्त घटली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news