24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयअपहरण झालेल्या जहाजावरील सर्व भारतीयांची सुटका

अपहरण झालेल्या जहाजावरील सर्व भारतीयांची सुटका

नवी दिल्ली : सोमालिया किनार्‍याजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लिला नॉरफोक जहाजावरील सर्व १५ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय नौदलाने सहा क्रू मेंबर्सचीही सुटका केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, अपहरण झालेल्या एमव्ही लीला नॉरफोक जहाजावरील सर्व भारतीय सुरक्षित आहेत.

एका संरक्षण अधिकार्‍याचा हवाला देत वृत्तसंस्थेने सांगितले की, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय नौदलाचे मरीन कमांडो ऑपरेशन करताना नौदलाचे हेलिकॉप्टरही अपहरण झालेल्या जहाजावर लक्ष ठेवून होते. यापूर्वी, अरबी समुद्रात लायबेरियन ध्वजांकित व्यापारी जहाजाचे अपहरण झाल्यानंतर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस चेन्नई रवाना केली होती.

भारतीय नौदलाचे मरीन कमांडो शुक्रवारी (५ जानेवारी) लायबेरियन ध्वजांकित व्यावसायिक जहाज एमव्ही लीला नॉरफोकवर उतरले होते आणि त्यांनी ऑपरेशन केले. याशिवाय नौदलाचे आयएनएस चेन्नई जहाजाजवळ पोहोचले होते. नौदलाने एमव्ही लीला नॉरफोकच्या अपहरणानंतर शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान पी-८आय आणि लांब पल्ल्याचे ड्रोन’ तैनात केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR