डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाने सचिन अंदुरेला जामीन मंजूर केला.अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर झाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमिद दाभोळकर यांनी, अजून विस्तृत निकाल आलेला नाही. तो वाचल्यानंतर पुढं काय करायचं याचा निर्णय घेण्यात येईल. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला देखील एप्रिल महिन्यात जामीन मंजूर झाला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली आहे. या प्रकरणातही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. असे वक्तव्य केले.

अनिसच्या पदाधिकारी आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘दोन दिवसांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला १३ वर्षे पूर्ण होतील. २०१८ मध्ये अंदुरे आणि कळसकर या दोघांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. हे दोघे प्रत्यक्ष खून करणारे आहेत असं कोर्टाने सांगितलं होते. असे सांगितले. आधी कळसकर त्यानंतर आता अंदुरेला उच्च न्यायालयाने जामीन दिला. जर या दोघांनी खून केला नाही तर मग कोणी खून केला हे आपल्याला १३ वर्षात शोधता आले नाही का? या दोघांना सीबीआयने समाजासाठी घातक असे म्हटले होते. आताचे बुवाबाजीचे प्रकार पाहता आपण कोणत्या जगात जगतोय हा प्रश्नच पडतो.’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील मुक्ता दाभोळकर यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news