झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

रांची : वृत्तसंस्था
झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि गैरव्यवहाराच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांपुढे राज्य सरकारने नमते घेत २०१४ पासून टीडीपीएल या कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि त्यांचे निकाल रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयांतर १६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आंदोलक देवेंद्र महतो यांच्यासह इतर विद्यार्थी नेत्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, परीक्षा घोटाळयांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, या मुख्य मागणीवर विद्यार्थ्यांचा एक गट अजूनही ठाम असून आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आरोग्यमंत्री इरफान अन्सारी, मंत्री दीपिका पांडे आणि आमदार जयराम महतो यांच्या संयुक्त मध्यस्थीनंतर देवेंद्र महतो, उम्मे हबीबा आणि राहुल क्रांती यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. आम्ही सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने लढलो. विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही, असा कडक कायदा विधानसभेत संमत करून सरकारने सुरक्षेची हमी द्यावी, असे देवेंद्र महतो उपोषण मागे घेताना म्हणाले. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेल्या परीक्षा रद्द करणे सोपे नव्हते, तरीही सरकारने निष्पक्ष चौकशी करून धाडसी पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आभार मानले.

सीबीआय चौकशीवर विद्यार्थी गट ठाम
सरकारने सीआयडी चौकशी जाहीर केली असली तरी विद्यार्थी नेत्यांमध्ये अजूनही असंतोष आहे. परीक्षा रद्द करणे हे केवळ पहिले पाऊल आहे. आमच्या सर्व मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. अधिकृत जीआर आल्यावर आम्ही पुढील रणनीती ठरवू, असे विद्यार्थी नेते पियुष कुमार आणि रवींद्र पासरवान यांनी स्पष्ट केले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news