27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeक्रीडाडेव्हिड वॉर्नर भावूक

डेव्हिड वॉर्नर भावूक

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. कारकीर्दीतील शेवटच्या कसोटी डावात त्याने ५७ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला. अखेरच्या कसोटी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर भावूक झाला होता. यावेळी बोलताना त्याने क्रिकेटमधील यशाचे श्रेय पत्नी आणि कुटुंबाला दिले. पत्नी कँडिस व्यतिरिक्त, भाऊ स्टीव्ह आणि त्याच्या पालकांचे आभार मानले. ज्यांच्या पाठिंब्यामुळे तो ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकला.

यावेळी वॉर्नर म्हणाला, ‘कुटुंब हा माझ्या जीवनाचा मोठा भाग आहे.’ त्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. याचे श्रेय मी माझ्या पालकांना देतो, ज्यांनी माझे उत्कृष्ट संगोपन केले. मी क्रिकेट खेळण्याचे श्रेय माझा भाऊ स्टीव्हला जाते, ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी आलो.

यानंतर त्याने आपल्या यशाचे श्रेय पत्नी कँडिसला दिले. यावेळी तो म्हणाला, ‘कँडिस माझ्या आयुष्यात आली आणि एक प्रकारे तिने मला योग्य मार्गावर आणले. आमचे एक सुंदर कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. मी मरेपर्यंत त्यांच्यावर प्रेम करेन. आणि सध्या मी खूप काही बोलू शकणार नाही कारण मी भावूक होत आहे. पण कँडिस, तू जे केलेस त्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी तू माझे जग आहेस.

डेव्हिड वॉर्नरने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. याआधी २००९ मध्ये त्याने वनडे आणि टी २० मध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटदरम्यान त्याने कँडिसला डेट करायला सुरुवात केली. यानंतर दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. डेव्हिडला तीन मुली आहेत. आयव्ही, इंडी आणि इस्ला, अशी त्यांची नावे आहेत. ज्यांच्यासोबत वॉर्नर अनेकदा त्याचे व्हीडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२४ च्या सुरुवातीला पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली होती. येथे त्याने सांगितले की, त्याला आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR