देशातील १८ शहरांना पुराचा सर्वाधिक धोका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजलेला असतानाच मुंबई आणि पुण्यासह देशातील १८ शहरांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राच्या गृह मंत्रालयाने पूर जोखमीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या १५ राज्यांतील १८ प्रमुख शहरांची यादी तयार केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली.

शहरी पूर जोखीम निवारण कार्यक्रमांतर्गत नियोजनासाठी गृह मंत्रालयाने एकूण ५,५२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी मुंबईसाठी ७०७.७१ कोटी रुपये, पुण्यासाठी २८६.६९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मुंबईला १५० कोटी रुपये, तर पुण्याला ७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, दुस-या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या शहरांना अद्याप एकही रुपयाचा निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती राय यांनी दिली. पुराची उच्च असुरक्षितता, दाट लोकवस्ती आणि प्रमुख क्षेत्रीय घटकांचे एकत्रित मूल्यांकन करून या शहरांची निवड करण्यात आली आहे.

पुरामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी गृह मंत्रालयाने शहरी पूर जोखीम निवारण कार्यक्रम सुरू केला आहे. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यासह चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या सात महानगरांत हा कार्यक्रम राबविण्यास मंजुरी दिली आहे. दुस-या टप्प्यात भोपाळ, भुवनेश्वर, गुवाहाटी, जयपूर, कानपूर, पटणा, रायपूर, तिरुवनंतपुरम, विशाखापट्टणम, इंदूर आणि लखनौ या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

अनियोजित विकासामुळे वाढली जोखीम
शहरांचा अनियोजित विकास, सिमेंटचे पक्के रस्ते आणि पाणी जिरण्यासाठी अपुरी मोकळी जागा यामुळे पूरस्थितीचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक जलमार्ग आणि तलावांवर झालेले अतिक्रमण तसेच पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने अनेक शहरांमध्ये पूरसंवेदनशीलता वाढली आहे.

रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न
भोतेकोशी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरामुळे अनेक मार्गांवर माती आणि ढिगारा साचला आहे. सशस्त्र पोलिस दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक रस्ते मोकळे करण्याच्या कामात सहभागी झाले आहेत. ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

३० हून अधिक देशांचे नागरिक बेपत्ता
नेपाळच्या पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, ३० हून अधिक देशांतील पर्यटक बेपत्ता असून यात पुढील देशांच्या पर्यटकांचा समावेश आहे.
अमेरिकेचे ६५
मलेशियाचे ५१
युक्रेनचे ५३
ऑस्ट्रेलियाचे ३५
ब्रिटनचे ३३
कॅनडाचे २५
दक्षिण कोरियाचे ९
सिंगापूरचे ८
जर्मनीचे ८
रशियाचे ८
दक्षिण आफ्रिकेचे ६
लॅटव्हियाचे ६
जपानचे ५
न्यूझीलंडचे ५
फ्रान्सचे ४
बेल्जियमचे ३
स्पेनचे ३

याशिवाय इटली, कझाकस्तान, पोर्तुगाल, आयर्लंड व नेदरलँड्समधील प्रत्येकी दोन जण बेपत्ता आहेत. बेलारूस, फिनलंड, हंगेरी, इस्रायल, लिथुआनिया, फिलिपिन्स, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, सर्बिया आणि स्वीडन या देशांतील प्रत्येकी एक नागरिक बेपत्ता असल्याचे पर्यटन मंडळाने सांगितले. बेपत्ता ५३ युक्रेनियन नागरिकांपैकी ४६ पर्यटक असून नेपाळी अधिका-यांचा त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news