देशभरातील २,५७३ पंपांवरील पेट्रोल विक्री थांबविली

नवी दिल्ली/ मुंबई : सरकारी तेल विपणन कंपन्यांमध्ये इंडियन ऑइलच्या सर्वाधिक १,२५७ पंपांचा समावेश असून भारत पेट्रोलियमचे ९१५ आणि भारत पेट्रोलियमचे ४०१ पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. इथेनॉलविरोधात आवाज उठल्यानंतर सुरुवातीला एचपी या कंपनीने आपल्या पेट्रोल पंपांवर टेस्टिंग केल्याचा दावा केला होता. यामध्ये पेट्रोलमध्ये काहीच समस्या नसल्याचे म्हटले होते.

या धडक कारवाईची ठिणगी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या एका पत्राने पडली. देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी विशेषत: मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांनी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून गोळा केलेल्या २५० हून अधिक इंधन नमुन्यांची गुप्तपणे तपासणी केली होती. या तपासणी अहवालात ई २० पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाण्याचे प्रमाण सरकारी मर्यादेपेक्षा धक्कादायक पटीने जास्त असल्याचे उघड झाले. रॉयटर्सच्या चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर ग्राहकांचा असंतोष आणि वाहन कंपन्यांची चिंता लक्षात घेऊन मंत्रालयाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पेट्रोलमध्ये क्लोराईडचे प्रमाण जास्तीत जास्त ३ स्रस्रे असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत हे आकडे भयानक आढळले.

वाहनांच्या इंजिनवर थेट आघात; अवघ्या २०० किमीमध्ये धोका
इंधनातील ऑरगॅनिक क्लोराईड हे अत्यंत गंज चढवणारे रासायनिक द्रव्य असते. आधुनिक गाड्यांमधील प्रिसिजन फ्युएल इंजेक्टर्स केवळ १ ते ३ स्रस्रे पातळी सहन करू शकतात. जास्त क्लोराईडमुळे इंधनाची रासायनिक रचना आम्लीय बनते, ज्यामुळे फ्युएल लाईन्स, इंजेक्टर्स, फ्युएल पंप आणि एक्झॉस्ट सिस्टीम खराब होते. महिंद्राच्या एका वरिष्ठ अधिका-याने अंतर्गत ईमेलमध्ये इशारा दिला होता की, अशा क्लोराईडयुक्त पेट्रोलमुळे अवघ्या २०० किलोमीटरच्या प्रवासातही गाडीची फ्युएल सिस्टीम पूर्णपणे निकामी होऊ शकते.

८८ हजार पंपांवर दिवसातून १२ वेळा तपासणी
ग्राहकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी आणि पुरवठा साखळी शुद्ध ठेवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. ८८,९९५ पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांमध्ये दररोज ८ ते १२ वेळा पाण्याचे प्रमाण तपासणे अनिवार्य केले आहे. ८४,६८७ जुन्या पंपांचे ऑडिट पूर्ण झाले असून, पावसात टाक्यांची सुरक्षितता तपासली जात आहे. इथेनॉल वाहून नेणा-या टँकर्सवर ७,२९६ सल्फर टेस्ट आणि १,०७९ क्लोराईड टेस्ट करण्यात आल्या आहेत.
१ एप्रिलपासून देशात केवळ ई २० पेट्रोलच उपलब्ध असल्याने वाहनचालकांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. अशा स्थितीत बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) ने ई २० पेट्रोलमध्ये क्लोराईडचे कायदेशीर मानक तातडीने निश्चित करावे, अशी मागणी ऑटोमोबाईल उद्योगाकडून सातत्याने केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news